Dhule Massage Parlour Raid Uncovers Illegal brothel racket Saam Tv News
महाराष्ट्र

बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच टाकली रेड, आरोपी फरार

Dhule Massage Parlour Raid Uncovers Illegal brothel racket: धुळ्यातून धक्कादायक घटना उघड. मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय. २ पीडित तरूणींची सुटका.

Bhagyashree Kamble

  • धुळ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय.

  • पोलिसांना गुप्त माहिती मिळताच टाकला छापा.

  • २ पीडित तरूणींची सुटका.

धुळे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तपासात पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायावर छापा टाकत २ पीडित तरूणींची सुटका केली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी फरार असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

धुळे शहरातील देवपूर भागातील झेंडा चौकाजवळील सप्तश्रृंगी कॉलनीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. याबाबत गुप्त माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीच्या व्यवसायावर छापा टाकण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी बॉडी मसाज पार्लरवर छापा टाकण्यासाठी पोलीस पथक तयार केली. पोलिसांनी माहितीच्या आधारे, धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत पोलिसांनी २ पीडित तरूणींची सुटका केली. मात्र, या कारवाईत मुख्य आरोपी फरार झाला.

सध्या पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT