Dhule Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : अक्कलपाडा, येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग; मुसळधार पावसाने पाण्याच्या पातळीत वाढ

Dhule Parbhani News : राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून परतीचा मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे

भूषण अहिरे, राजेश काटकर

धुळे/परभणी : राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून परतीचा मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यात धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारे येलदरी, सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून वीजनिर्मिती केंद्राच्या तीन दरवाजांतून पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. 

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत विसर्ग
अक्कलपाडा धरणाच्या (Akkalpada Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळेच अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. २७ हजार १९४ क्यूसेक वेगाने पांझरा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे पांझरा नदी (Panjhara River) काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. पांझरा नदी पात्रामध्ये अक्कलपाडा धरणातून पुढील काही तासांमध्ये पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्याची शक्यता देखील प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणारे
येलदरी धरण अखेर १०० टक्के भरले आहे. ६० हजार हेक्टरवरील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पूर नियंत्रण करण्यासाठी येलदरी वीजनिर्मिती केंद्राच्या तीन दरवाजातून पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या दरवाजामधून शनिवारी सकाळी ४४ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणास येलदरी धरणाच्या जलविद्युत केंद्रातील तीन संचांमधून वीजनिर्मितीद्वारे पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! पुढील १० दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोणत्या भागावर होणार परिणाम? वाचा A टू Z माहिती

Shocking: औरंगाबादमध्ये ५ मैत्रिणींनी एकत्र विष प्यायलं, चौघींचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

Health Care : दररोज एक लवंग खाण्याचे '५' आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Mahad Tourism : धबधबे, धुके अन् डोंगररांगा; हिवाळ्यातील नंदनवन, 'येथे' ट्रेकिंग करताना मिळेल अविस्मरणीय अनुभव

SCROLL FOR NEXT