महाराष्ट्र

तिकिट न मिळाल्‍याने नाराज उमेदवाराकडून पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक

Rajesh Sonwane

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समितीच्या पोट निवडणुकींसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असताना नाराज उमेदवारांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज असलेल्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला करून नाराजी व्यक्त केली आहे. (dhule-news-zilha-parishad-election-bjp-candidate-no-tecket-and-car-attack)

साक्री तालुक्यातील पंचायत समितीच्या नऊ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे तलसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तिकीट वाटपावरून वाद उफाळून आला. यातूनच एका पदाधिकाऱ्याच्या बोलेरो वाहनाची काच फोडण्यात आल्याची घटना घडली. साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तिकिट न मिळाल्‍याने वाद

पंचायत समितीच्या धाडणे गणातून गेल्यावेळी निवडून आलेल्या रोहिणी सुधीर अकलाडे आणि घाणेगाव गणातील उमेदवार सुनिता रमेश सरक यांना यावेळी भाजपने उमेदवारी दिली नाही. पक्षाकडून उमेदवारीचे तिकिट न मिळाल्याने येथील तहसील कार्यालयासमोर भाजपाचे पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, रमेश सरक आणि सुधीर अकलाडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यातून मोहन सूर्यवंशी यांच्या वाहनाची पुढची काच दगड मारून फोडण्यात आली. यासंदर्भात मोहन सूर्यवंशी यांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS News Update : मराठीला नाही म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप; पहा काय आहे प्रकार

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

SCROLL FOR NEXT