बॅंका, शासकीय कार्यालयात काेराेना हाेत नाही का? वेदांतिकाराजे

vedantikaraje bhosale in satara traders agitation
vedantikaraje bhosale in satara traders agitation

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाने जिल्हा लाॅकडाउन lockdown केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व गोष्टी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयास जिल्ह्यातील व्यापा-यांसह सातारा शहरातील व्यापारी वर्गाने कडकडून विरोध दर्शविण्यास प्रारंभ झाला आहे. आज (मंगळवार) व्यापा-यांच्या मूक आंदाेलनात कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भाेसले vedantikaraje bhosale यांनी सहभाग घेतला. यावेळी वेदांतिकाराजेंनी सरसकट बंद ठेवणे याेग्य नाही. मंडई, बॅंका, माध्यमांची, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे काेविड हाेत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करु नका. प्रशासनाने तातडीने लाॅकडाउन हटवावे अशी मागणीही केली. (satara-traders-agitation-begins-against-shekhar-sinh-lockdown-order-vedantikaraje-bhosale)

आज (मंगळवार) सकाळी सातारा शहरातील व्यापारी पोवई नाका ते राजवाडा परिसरात आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाच्या हातात फलक होते. या फलकांवर व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा लिहिल्या हाेत्या.

vedantikaraje bhosale in satara traders agitation
माझं नाव काय माहिती आहे का?-उदयनराजे 

आज (मंगळवार) सातारा शहरात व्यापारी वर्गाच्या वतीने मूक आंदाेलन झाले. या आंदाेलनाची हाक समाज माध्यमातून देण्यात आली हाेती. त्यानूसार सकाळी आंदाेलनास प्रारंभ झाला आहे. राजवाडा, पाेवई नाका येथे आंदाेलक आपापल्या दुकानांच्या बाहेर कुटुंबासह हातात मागण्यांचे फलक घेऊन उभे हाेते. या आंदाेलकांना कर्तव्य साेशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भाेसले यांनी पाठींबा दिला. साै. भाेसले यांनी स्वतः हातात फलक घेऊन लाॅकडाउन हटविण्याची मागणी प्रशासनास माध्यमांद्वारे केली.

वेदांतिकाराजे भाेसले म्हणाल्या काेविडमुळे covid19 गेली दीड वर्ष झाली कधी लाॅकडाउन केले जात आहे तर कधी ते हटविले जात आहे. काेविड हा केवळ साता-यात आहे. उत्तरप्रदेश, गुजरात येथे लाेकसंख्या माेठ्या संख्येने आहे. तेथे पण काेराेनाचा प्रादुर्भाव झाला परंतु लाॅकडाउनची मात्रा अल्प प्रमाणात हाेती. येथे आपल्याकडे दाेन तीन महिने लाॅकडाउन केले जात आहे. यामुळे लाेकांनी जगायचे कसे हा प्रश्न उपस्थित हाेत आहे. पैसे नसल्याने लाेक हतबल हाेऊ लागले आहेत. आत्महत्या वाढू लागल्या आहेत. सर्व व्यापा-यांसमवेत हातगाडीधारक देखील रस्त्यावर आलेत. जे राेज कमावितात आणि जे राेज खातात असे 50 टक्के लाेक आपल्या देशात आहेत. तीन तीन महिने लाॅकडाउन ठेवले तर आपला गरीबाचा देश काेणीच म्हटले नसते. प्रत्येकाकडे इतके पैसे असते तर ते विना कमविता तीन तीन महिने जगू शकले असते. आज अनेकांवर उपासमारीची वेऴ आली आहे. सर्वांत वाईट परिस्थिती महिला वर्गाची झाली आहे. अनेकांच्या नाेक-या गेल्या आहेत. दीड वर्ष झाली त्यांच्याबाबत काेणीही भ्र शब्द काढत नाही.

कृष्णा सहकारी कारखाना निवडणुक krishna sugar factory election झाली. त्यावेऴेस सभा झाल्या. तेव्हा काेविड नव्हता का. काेराेनाच्या दुसरा टप्प्यात निवडणुक झाली तेव्हा प्रशासन काय करीत हाेते असा प्रश्न वेदांतिकाराजेंनी उपस्थित करुन मंडईत किती गर्दी हाेत आहे हे एकदा पहा जरा असे आवाहन केले. नियमांच्या अधीन राहून व्यापारी वर्गास परवानगी द्यावी अशी मागणी साै. भाेसलेंनी केली.

साै. भाेसले म्हणाल्या सरसकट बंद ठेवणे याेग्य नाही. मंडई, बॅंका, माध्यमांची, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे काेविड हाेत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करु नका. प्रशासनाने तातडीने लाॅकडाउन हटवून व्यापारी वर्गास दिलासा द्यावा.

यावेळी पाेवई नाका व्यापारी संघाचे सुशांत नावंधर म्हणाले अत्यावश्यक सेवा सुरु असूनही रस्त्यांवर गर्दी हाेत आहे हे सर्व आपण पाहत आहाेत. जिल्हाधिकारी यांनी लाॅकडाउन शिथिल करावे. सर्व व्यवसाय नऊ ते दाेन या वेळेत सुरु ठेवावे. आम्हांला आमचे कुटंब चालवायचे आहे. आमच्या कुटुंबाबराेच आमच्या दुकानांमध्ये काम करणा-या कामगारांचे कुटुंब चालवायचे आहे. पालकमंत्र्यांसह सर्व लाेकप्रतिनिधींनी मागण्याचा विचार करावा. काेराेना कमी करण्यासाठी उपाययाेजना आखाव्यात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com