Yuva sena 
महाराष्ट्र

युवासेनेची सायकल रॅली..पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध

युवासेनेची सायकल रॅली..पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : पेट्रोल डिझेल भाव वाढ संदर्भात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी युवासेनेच्यावतीने धुळ्यात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेनेने इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. (dhule-news-Yuvasena-cycle-rally-Central-government's-protest-against-petrol-and-diesel-price-hike)

युवासेनेकडून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणा विरोधात निषेध नोंदवण्यासाठी शिवस्मारक आग्रा रोड धुळे येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेच्या या निषेध सायकल रॅलीमध्ये युवकांत बरोबरच मोठ्या संख्येने युवतींचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळाले आहे.

मोदी सरकारचा निषेध

हेच का अच्छे दिन असा सवाल करत युवासेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले असल्याचा आरोप देखील यावेळी निषेध कर्त्यांकडून करण्यात आला. संपूर्ण राज्यामधील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता युवसेनेच्यावतीने सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT