Dhule Ganesh Visarjan Saam tv
महाराष्ट्र

Dhule Ganesh Visarjan : धुळे गणपती विसर्जन मिरवणूक दुर्घटना; ट्रॅक्टरखाली चिरडण्याच्या दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू

Dhule News : गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या.. म्हणत निरोप देण्यात आला. निरोप देताना ठिकठिकाणी गणेश भक्तांकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या

भूषण अहिरे

धुळे : गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर लाडक्या गणरायाला निरोप देत विसर्जन करण्यात आले. दरम्यान धुळे तालुक्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली चिरडल्याने तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतील गंभीरित्या जखमी असलेल्या एका महिलेचा देखील उपचारादरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या आता चार झाली आहे. 

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या.. म्हणत निरोप देण्यात आला. निरोप देताना ठिकठिकाणी गणेश भक्तांकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. मात्र (Dhule) धुळे तालुक्यातील चितोड या गावात देखील काढण्यात आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे निरवणुकीतील भाविक चिरडले गेल्याची दुर्घटना (Accident) घडली होती. यात तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले आहेत. 

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू या घटनेतील सर्व जखमींवर धुळ्याच्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारासाठी दाखल रुग्णांमधील गायत्री पवार (वय २५) या महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा तीन वरून चार वर पोहोचला आहे. दरम्यान अद्यापही पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

SCROLL FOR NEXT