संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आज हदगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आले. आर्थिक मदत द्या सरकारवर वळू सोडण्याचा दिला इशारा.
मागच्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात (Heavy Rain) मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका हा (Nanded) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला बसला आहे. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी या भागाची पाहणी केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी; यासाठी स्वराज्य पक्ष आक्रमक झाला आहे.
तर २७ सप्टेंबरला कार्यालयात वळू सोडणार
दरम्यान आज हदगाव तहसीलवर स्वराज्य पक्षाने बैलगाडी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात स्वराज्य पक्षासह शेतकरी बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या; अन्यथा येणाऱ्या २७ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसकर यांनी दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.