Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात पाणी प्रश्‍न पेटला; फडणवीसांच्‍या आश्‍वासनानंतरही सुटला नाही प्रश्‍न, राष्‍ट्रवादीचे महापालिकेसमोर आंदोलन

धुळ्यात पाणी प्रश्‍न पेटला; फडणवीसांच्‍या आश्‍वासनानंतरही सुटला नाही प्रश्‍न, राष्‍ट्रवादीचे महापालिकेसमोर आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात भर उन्हाळ्यात नागरिकांना आठ दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे (Dhule) धुळेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरोधात (NCP) राष्‍ट्रवादीने आज मनपा प्रशासन व सत्‍ताधारी यांच्‍या विरोधात आंदोलन केले. (Live Marathi News)

धुळे महापालिका प्रशासन व भाजप सत्ताधार्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Corporation) प्रवेशद्वारावरच सत्ताधारी व पालिका प्रशासनाचा घोषणाबाजी करून निषेध केला आहे.

फडणवीसांच्‍या आश्‍वासनाचे काय?

२०१८ मध्ये पालिका निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळेकरांना दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनास साडेचार वर्षे उलटली तरी देखील धुळेकरांचा पाणी प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडविला नाही. असे म्हणत राष्ट्रवादीतर्फे सत्ताधारी व पालिका प्रशासनाला गंभीर इशारा देत पुढील आठ दिवसाच्या आत एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न केल्यास हांडा आंदोलन करण्याचे देखील स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT