Shindkheda News  Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda News : तापी नदीत उडी घेत उपसरपंचाने संपविले जीवन

Dhule News : जवानसिंग गिरासे यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

साम टिव्ही ब्युरो

शिंदखेडा (धुळे) : रामी (ता. शिंदखेडा) येथील उपसरपंच जवानसिंग काशीनाथ गिरासे (वय ४३) यांनी तापी नदीच्या पुलावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र त्यांनी टोकाचे पाऊल कोणत्या (Dhule) करणारे उचलले याचा तपास पोलीस करत आहेत. (Breaking Marathi News)

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील रामी या गावचे उपसरपंच असलेले जवानसिंग काशीनाथ गिरासे यांनी टोकाचे पाऊल उचलले. गिरासे हे २६ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास सारंगखेडा येथील तापी नदीपात्रात (Tapi River) टाकरखेडा पुलावरून गेले. यानंतर त्यांनी पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिनाभरापूर्वीच झाली होती निवड 

गिरासे यांची महिन्यापूर्वी उपसरपंचपदी निवड झाली होती. ते भाजपचे खंदे समर्थक होते. अविवाहित जवानसिंग गिरासे यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस शिपाई सुनील महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT