Sakri News Saam tv
महाराष्ट्र

Sakri News : अवकाळीने संसार उघड्यावर; पडलेले घर पाहून महिलेचे अश्रू अनावर

Dhule Sakri News : अवकाळी पावसासोबतच सोसाट्याचा वारा देखील असल्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर झाला असून या वादळी वाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी घरांची देखील पडझड

भूषण अहिरे

धुळे : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वारा असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेती पिकांचे नुकसान होण्यासोबत घरांची पडझड देखील होत आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्यातील मोहने गुंजाळ गावात घर पडल्याने संसार उघड्यावर आला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून हे दृश्य पाहून वृद्ध महिलेचे अश्रू अनावर झाले आहेत. 

धुळे जिल्ह्यात देखील मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाची रोज हजेरी लागत आहे. साक्री तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या अवकाळी पावसासोबतच सोसाट्याचा वारा देखील असल्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर झाला असून या वादळी वाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी घरांची देखील पडझड झाल्याने बहुतांशी नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले आहे. 

पडलेले घर पाहून महिलेचा आक्रोश 

दरम्यान साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत मोहने गुंजाळ गावातील सुरीबाई साधू अहिरे या वयोवृद्ध महिलेच्या घराची देखिल पडझड झाली आहे. हि वृद्ध महिला शेती कामासाठी बाहेर गेली असताना घराच्या भिंती कोसळल्या. यामुळे त्या बालंबाल बचावल्या आहेत. शेतातून घरी परतल्यानंतर महिलेने आपल्या घराची झालेली पडझड बघितल्यानंतर या महिलेचे अश्रू अनावर झाले असून ही वृद्ध महिला आपले नुकसान झाल्याचे बघितल्यानंतर ढसाढसा रडली आहे.  

नुकसान भरपाईची मागणी 

दरम्यान मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वृद्ध महिलेवर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. घर पडल्याने संसार उघड्यावर आला आहे. या संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत मोहानेचे लोकनियुक्त सरपंच जितू गावित यांनी या नुकसानीची पाहणी करत प्रशासनाकडे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC महा एल्गार मेळाव्यापूर्वी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला पाठवली नोटीस

Maharashtra Live News Update: गोकुळ दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

Vasubaras 2025: वसुबारस म्हणजे काय? दिवाळीत का साजरी करतात?

Shocking: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, वर्गमित्रानेच केलं भयंकर कृत्य; कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर...

Spine surgery: मणक्याच्या शस्त्रक्रियेला घाबरुन जाऊ नका; भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT