Dhule News Saam Digital
महाराष्ट्र

Dhule News : ट्रकचालकाने दुचाकीचालकाला चिरडलं; संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक

Dhule Accident News : धुळे शहरातील देवपूर परिसरातील एल एम सरदार हायस्कूल समोर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

धुळे शहरातील देवपूर परिसरातील एल एम सरदार हायस्कूल समोर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला आहे. परिसरातील संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या दोन्ही काचा फोडल्या असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

ट्रक खाली चिरडून मृत्युमुखी पडलेला तरुण हा 18 ते 20 वयाचा असून वाहनावरून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची माहिती देवपूर पोलीस घेत असून, या अपघातानंतर परिसरात एकच खबाळ उडाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु देवपूर पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला असून सध्या तणावपूर्ण शांतता परिसरात बघावयास मिळत आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरातील अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रस्ता क्रॉस करणारी महिला दुचाकीच्या अचानक समोर आल्याने दुचाकीचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. ट्रक खाली चिरडून युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT