Dhule Accident News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: ट्रकच्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

ट्रकच्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचाकडून शिंदखेडाकडे जात असलेल्‍या ट्रक चालकाचे नियंत्रण (Dhule) सुटल्याने दुभाजकाला धडकला. यानंतर बाजूला रस्त्या किनारी असलेल्या घराजवळ उलटला. या अपघातामध्ये (Accident) तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. (Maharashtra News)

शिंदखेडाकडे जात असलेल्‍या भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक रस्‍त्‍यावरील दुभाजकाला जावून धडकला. यावेळी रस्‍त्‍याच्‍या बाजूला उभ्या असलेल्या चौघांना या ट्रकने अक्षरशः चिरडले. यात दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आणखी एका पोस्टमनचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आणखी दोन जणांवर शासकीय रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरू असून या ट्रक चालकाला देखील गंभीर दुखापत झाल्याने मृतांची संख्या आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य केले. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयामध्ये (Shindkheda) उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली व आयशर खाली अडकलेल्या महिलांना उपचारासाठी दाखल देखील करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी या दोघेही महिलांना मृत घोषित केल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

SCROLL FOR NEXT