corona death saam tv
महाराष्ट्र

कोरोनात छत्र हरपले..चिमुकल्यांकडे नातेवाईकांनीही फिरविली पाठ; शासनाच्या योजनेचा मिळाला आधार

कोरोनात छत्र हरपले..चिमुकल्यांकडे नातेवाईकांनीही फिरविली पाठ; शासनाच्या योजनेचा मिळाला आधार

भूषण अहिरे

धुळे : कोरोनाच्या काळात आई-वडील गमावलेल्या निराधार मुलांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनातर्फे ज्या उपाययोजना राबविण्यात आल्या. त्या उपाययोजनांमुळे आई-वडिलांच्या स्वरूपात असलेले मायेचे छत्र (Corona Death) हरपलेल्या लहानग्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भक्कम आधार मिळाला. (dhule news Those who lost mother and father in Corona got the support of the government plan)

कोरोनाच्या (Corona) संकट काळात पालक गमावलेल्या निराधार चिमुकल्यांना शासनाच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत बहुतांश नागरिकांनी उपचाराअभावी असेल किंवा शरीरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जीव गमावला. त्यामुळे बहुतांश चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले. अशावेळी सख्ख्या नातेवाईकांनी देखील या चिमुकल्यांकडे पाठ फिरवली. अशा परिस्थितीमध्ये या चिमुकल्यांच्या जीवनाचा आधार बनत राज्य शासनातर्फे निराधार झालेल्या चिमुकल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली. राज्य शासनाच्या या मदतीमुळे निराधार झालेल्या या चिमुकल्यांना मायेचे छत्र हरपल्याने अंधारमय झालेल्या जीवनात आशेचा किरण दिसू लागला.

मामा आले पुढे

धुळे (Dhule) जिल्ह्यातील दोघ भावंडांचे आई-वडील या कोरोनाच्या संकट काळामध्ये जगाला निरोप देत आपल्या चिमुकल्यांना एकटे टाकत निघून गेले. परंतु त्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांना आधाराची गरज असताना अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सख्या नातेवाईकांनी देखील पाठ फिरविली. अशा परिस्थितीमध्ये या चिमुकल्यांचा सांभाळ करणार तरी कोण? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी दोन्ही चिमुकल्यांचे मामा त्यांच्या मदतीसाठी धावून आले. जे काम आई– वडील हरपल्यानंतर सख्या काका चुलत्यांनी केले पाहिजे होते ते आता या चिमुकल्यांच्या मामांनी केले आहे. अशातच प्रशासनातर्फे कोरोनामुळे आई-वडील हरपलेल्या चिमुकल्यांना मदतीचा हात पुढे केल्यामुळे निराधार झालेल्या या चिमुकल्यांना भक्कम आधार मिळाला आहे. आयुष्य जगण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भक्कम आधार मिळाला असल्याची भावना या दोनही चिमुकल्यांचा सांभाळ करणाऱ्या मामांनी व्यक्त करत राज्य शासनाचे आभार मानले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT