परवाना घेतला, लाभार्थ्यांना मात्र लाभ नाही; ११ स्वस्त धान्य दुकाने निलंबित

परवाना घेतला, लाभार्थ्यांना मात्र लाभ नाही; ११ स्वस्त धान्य दुकाने निलंबित
Ration Shop
Ration Shopsaam tv
Published On

धुळे : स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेतलेला असताना लाभार्थ्यांना सेवा न देणे, वर्षानुवर्षे दुकाने कार्यान्वित न ठेवणे, कोरोना काळात ग्राहकांना सेवा न देणे अशा विविध कारणांनी जिल्ह्यातील अकरा स्वस्त धान्य दुकाने (Ration Shop) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केले. दुकाने निलंबनाच्या अनुषंगाने संबंधितांना नोटिसा बजावल्या असून त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही होणार आहे. (dhule news Licensed carry beneficiaries do not benefit 11 ration shop Suspended)

Ration Shop
Lata Mangeshkar: ५०० किलो रंगोळीतून साकारली ‘लतादीदीं’ची प्रतिकृती

स्वस्त धान्य दुकानाचा केवळ परवाना घेतला. मात्र, या दुकानांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कोणतीही सेवा दिली नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्षानुवर्षे दुकाने अकार्यान्वित ठेवली, कोरोना (Corona) काळात ग्राहकांना सेवा दिली नाही, वैद्यकीय रजेचे कारण पुढे केले. वास्तविक शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदार जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत वैद्यकीय रजेवर जाऊ शकतील अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी तरतूद आहे. मात्र संबंधित स्वस्त धान्य दुकानदार वर्षानुवर्षे रजेवर गेल्याने त्याचा ताण इतर स्वस्त धान्य दुकानदारांवर तसेच पुरवठा यंत्रणेवर पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन (Dhule News) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अकरा स्वस्त धान्य दुकाने निलंबित केली.

निलंबित केलेली दुकाने अशी

शिरपूर (Shirpur) तालुका : चिलारे- रवींद्र सजन पावरा (दुकान क्रमांक-१२६), बलकुवे- योगेश माधवराव पाटील (दुकान क्रमांक-६३), उंटावद- श्री शनी मंदिर ट्रस्ट (दुकान-१८४), खर्दे बु.- नरेंद्र नारायण सोनवणे (दुकान-१९३), वाकपाडा- राकेश दुलबा पावरा (दुकान-१३६), साकवाद- राजेंद्र नथू पाटील (दुकान-१५३), थाळनेर- पी. झेड. ठाकूर (दुकान- १०५). शिंदखेडा तालुका : विखुरले- भीमगर्जना महिला बचत गट ( दुकान-१०५), चांदगड- सोनाऱ्या रानमळा महिला बचत गट (दुकान-१५०), वायपूर- रमेश महादेव भावसार (दुकान-७२), शिराळे- मातोश्री महिला बचत गट (दुकान-१८०). हे सर्व दुकानदार तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी वैद्यकीय रजेवर असल्यामुळे या दुकानांचे प्राधिकार पत्र पुढील एक महिन्यासाठी निलंबित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com