Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: बनावट चावी करून मालवाहू गाड्यांची चोरी; चोरटे पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे चाळीसगाव रोडवर एका हॉटेलजवळ बिना नंबर प्लेट असलेली दोन वाहन अंधारात उभे करून (Dhule News) दोन जण संशयास्पद उभे होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता चौकशीअंती वाहने चोरीची असल्‍याचे समोर आले. यानंतर (Police) पोलिसांनी त्‍या चोरांना ताब्‍यात घेतले आहे. (Live Marathi News)

सूत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला (Dhule LCB) मिळालेल्‍या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला. या छाप्या दरम्यान दोन पिकअप वाहने पोलिसांना आढळून आले. त्यापैकी एका वाहनावर नंबर प्लेट नसल्याचे देखील आढळून आले आहे. छापा टाकत असताना संबंधितांना संशय आल्याने दोघे जणांनी संबंधित ठिकाणावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पसार झालेल्‍या चोरट्याचा शोध

दोघेही चोरटे मालेगाव येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, या चोरट्यांनी बनावट चावीच्या आधारे ही वाहने पळवली असल्याची माहिती उघडकीस आले. पसार झालेल्या चोरट्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Chilled Water: फ्रीजशिवाय थंड पाणी कसं प्यायचं?

Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT