Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: शेतात काढून ठेवलेला कापूस, सोयाबीन चोरी; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

शेतात काढून ठेवलेला कापूस, सोयाबीन चोरी; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

भूषण अहिरे

धुळे : चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कापूस व सोयाबीन पिकावर देखील वक्रदृष्टी केली आहे. कापूस (Cotton) व सोयाबीन पिकांची शेतातूनच चोरी झाल्‍याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Breaking Marathi News)

साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर परिसरात असलेल्या शेणपूर फाटा शिवारात सुनील घरटे यांनी आपल्या शेतातून काढून ठेवलेला कापूस व सोयाबीनची (Soybean) चोरट्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सुमारे दहा ते बारा क्विंटल कापूस व पाच ते सहा क्विंटल सोयाबीन चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लाखोचे नुकसान

मोठ्या कष्टाने घेतलेले पीक चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकऱ्याचे लाखोंची नुकसान झाले आहे. याबाबत साखरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले असून पुढील तपास सागरी पोलीस करीत आहेत. परंतु चोरट्यांनी शेतातून काढून ठेवलेले पीक चोरून नेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंदापुरातील बेकायदेशीर गणेश मंदिर आणि मूर्ती हटवली...

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT