theft 
महाराष्ट्र

न्यायाधीशांच्या घरावरच चोरट्यांनी मारला डल्ला

न्यायाधीशांच्या घरावरच चोरट्यांनी मारला डल्ला

भूषण अहिरे

धुळे : शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता तर चोरट्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की चोरट्यांनी चक्क न्यायाधीशांच्या घरावरतीच डल्ला मारला आहे. (dhule-news-Theft-at-the-judge's-house-in-Dhule)

धुळे (Dhule) शहरातील शहर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या कोळवलेनगर परिसरातील भोलेबाबानगर येथील न्यायाधीशांसह त्यांचे कुटुंबीय काही कारणास्तव बाहेरगावी गेले होते. बंगल्यात कोणीही नसल्याची संधी साधत बंद बंगल्यामध्ये कुलूप व कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. रविवारी संध्याकाळच्या दरम्यान परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली.

परिवार अद्याप परतला नाही

पोलिसांना माहिती समजताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी घराचे कुलूप व कडी तुटलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आली. तर घरातील सर्व सामान देखील अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. यासंदर्भात संबंधित कुटुंबीय घरी नसल्यामुळे घरातील कुठल्या वस्तू चोरी (Theft) गेल्या आहेत. या संदर्भात माहिती कळू शकलेली नाही. परंतु पोलिस प्रशासनातर्फे सर्वत्र तपास यंत्रणांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण सुरू केल आहे. परंतु एका न्यायाधीशांच्या घरीच चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT