Dhule Toll Plaza Rada Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News: गावातील मुलांना नोकरी का देत नाही?, धुळ्यातील टोलनाक्यावर तुफान राडा, १२ जणांविरोधात गुन्हा

Dhule Toll Plaza Rada: धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीर फाट्याजवळील टोल नाक्यावर धिंगाणा घातल्याप्रकरणी १२ जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

भुषण अहिरे, धुळे

धुळ्यातील टोल नाक्यावर तुफान राडा करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील मुलांना नोकरी का नाही देत असा सवाल करत काही तरुणांनी टोलनाक्यांवर राडा करत तोडफोड केली. याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीर फाट्याजवळील टोल नाक्यावर धिंगाणा घातल्याप्रकरणी १२ जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टोलनाका चालक सारांश भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. गावातील मुलं कामाला का लावून घेत नाही? या कारणावरून १० ते १२ जणांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तसंच तुम्ही यापुढे टोलनाका कसा चालविता, आम्ही टोलनाका चालू देणार नाही, अशी धमकी देत तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या राड्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तालुका पोलिसांनी या सर्व गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून घेतली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युरिक एसिडवर रामबाण उपाय ठरेल 'ही' चटणी, झटपट बनवा

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Fact Check: सरकार मुलींना खरंच देणार २ लाख रुपये? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Raju Shetty : वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा; राजू शेट्टी यांची मागणी

RBI Governor Shaktikanta Das: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT