सांगली : महायुतीचे नेते हे एक वचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन मोडलेले नव्हतं. त्यामुळे आता सत्ता आली आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा; अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कारण महायुती सरकारने त्याने वचन दिलेले आहे. तसेच सर्वच लाडक्या बहिणीला २१०० रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे; अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.
सांगली (Sangli) येथे आले असता राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेवरून निवडणुकीच्या पूर्वी सरसकट सर्व बहिणींच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आली. मात्र नवीन आदेशानुसार निम्मेपेक्षा कमी महिलांना योजनेचा लाभ मिळेल. यामुळे घोषणा केल्याप्रमाणे सरसकट २१०० रुपये बहिणींच्या खात्यावर टाकावेट; असे म्हणत (Mahayuti) महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री पदावर भाजपचाच अधिकार
विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहता तसेच महाराष्ट्रात संख्याबळ पाहता; मुख्यमंत्री पदावर भाजपचाच अधिकार राहतो. असे मत देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
ईव्हीएम संपूर्ण देशातून हटवा
ईव्हीएम हटवायचे असेल तर संपूर्ण देशातून हटवावे लागेल. अमेरिका सारख्या देशांमध्ये सुद्धा जिथे सर्वाधिक डिजिटल क्रांती झालेली आहे. तिथे सुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल, तर भारताने का विचार करू नये? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. ईव्हीएम बाबत एक तर राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरे देऊन तो संभ्रम दूर करावा. नाहीतर खुलेपणाने एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी; असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.