सोलापूर : विधानसभा निवडणूक नुकताच पार पडली आहे. या निवडणुकीत अनेकांचा दारुण पराभव झाला आहे. यात माजी आमदार नरसय्या आडम यांचा देखील पराभव झाला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर आडम यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
नरसय्या आडम हे मार्कसवादी चाळवळीतील मोठं नाव म्हणून ओळखलं जातं. विद्यार्थी चळवळीपासूनच ते डाव्या विचारसरणीकडे ओढले गेले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा चेहरा म्हणून आडम यांची ओळख आहे. नरसय्या आडम हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून १९७८ ला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९८० ला त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. पुढे १९९५ ला ते सोलापूर शहर दक्षिण मधून निवडून गेले. तर १९९९ च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाने खचून न जाता २००४ ला सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून ते पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले.
२००९ ला मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि सर्व समीकरण बदलली. सोलापूर शहरात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण अशा तीन मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यामुळे नरसय्या आडम यांनी २००९ ते २०२४ पर्यंत सलग चार निवडणुका लढवल्या. मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांना अपयश आलं. तब्बल ४ टर्म निवडणूक जिंकणाऱ्या आडम यांना सलग ४ निवडणुकीत पराभवाचे तोंड बघावं लागलं आणि अखेर वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्याच्या पक्षांतराच्या जमान्यात आडम मास्तर हे एक झेंडा,एक पक्ष आणि एकाविचारासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आडम यांनी सोलापूर (Solapur News) शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. दरम्यान या निवडणुकीत देखील आडम यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कामगारांसाठी लाल झेंड्याच्याखाली सामाजिक आणि चळवळीत काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे. दरम्यान सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये फेर निवडणूक घ्यावी; यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
लवकरच वारसदार घोषित करणार
मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते नरसय्या आडम यांनी निवृत्ती जाहीर केली असून पक्ष चालविण्यासाठी आडम हे लवकरच त्यांचा वारसदार ही जाहीर करणार असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.