महाराष्ट्र

गुंजला निलेश महाजन अमर रहेचा नारा..शहीद ज़वानावर सोनगिर येथे अंत्यसंस्कार

गुंजला निलेश महाजन अमर रहेचा नारा..शहीद ज़वानावर सोनगिर येथे अंत्यसंस्कार

भूषण अहिरे

धुळे : मणिपूर येथे गोळी लागून उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या निलेश महाजन या वीर जवानाच्या पार्थिवावर आज सोनगीर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने धुळेकर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. भारत माता की जय तसेच निलेश महाजन अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा अंत्यसंस्कारावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी दिल्या.

शहादा तालुक्यातील कळंबू गावांचे सुपुत्र शहीद निलेश अशोक महाजन यांना 24 जुलैला रात्री साडेआठ वाजता वीरमरण आले. मणिपूर येथे कर्तव्य बजावत असतांना 6 नोव्हेंबर 2020 रोजी गोळी लागून गंभीर जखमी झाले होते. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर गुहाटी येथे दाखल करून उपचार सुरू होते. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून उपचार सुरू असतांना 24 जुलैला प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना वीरमरण आले.

26 व्या वर्षी विरमरण

1 सप्टेंबर 2016 रोजी बेळगांव (कर्नाटक) येथे प्राशिक्षण पूर्ण करून सुरुवातीला दिल्ली येथे रुजू झाले होते. त्यानंतर मणिपूर येथे सेवा बजावली पाच ते साडेपाच वर्षाच्या सेवा बजावल्यानंतर वयाचे २६ व्या वर्षी वीरमरण आल्याने कळंबू गावावर शोककळा पसरली आहे. निलेश यांच्या पच्यात एक विवाहित बहिण सीमा किशोर महाजन व मोठा भाऊ दिपक अशोक महाजन हा शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील एम. आय. डी. येथे सुदर्शन मिनरल सुपरवायझर या पदावर असल्याने तो धुळे तालुक्यातील सोनगीर येथे वास्तव्यास आहे.

अनेकांना अश्रु अनावर

शहीद नीलेश महाजन यांच्या पार्थिवावर आज सोनगीर येथील दोंडाईचा रस्त्यावरील सोमेश्वर महादेव मंदिरा जवळील स्वामी नारायण मंदिराच्या मैदानावर शोकाकुल वातावरणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी हजारोच्या संख्येने धुळेकर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. भारत माता की जय तसेच निलेश महाजन अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांनी दिल्याने घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT