Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: गुटख्याची तस्करी रोखली; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शिरपूरकडून धुळेमार्गे औरंगाबादकडे होणारी गुटखा तस्करी पोलिसांनी सापळा रचून रोखली. या कारवाईत (Police) पोलिसांनी १२ लाखांचा (Gutkha) गुटखा व आयशरसह एकूण २७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात वाहनचालक, क्लिनर व वाहनमालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. (Dhule Police News)

धुळे- औरंगाबाद महामार्गावरून शिरपूरकडून धुळेमार्गे गुटखा तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी शनिवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास औरंगाबाद (Aurangabad) महामार्गावर सापळा रचून हॉटेल फायफायजवळ संशयित ट्रक पकडला. मात्र, वाहनावरील चालक व क्लीनरसह संशयित पसार झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटख्याचा साठा आढळून आला.

२७ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सदर कारवाईत नऊ लाख ६० हजारांचा राजनिवास पानमसाला, दोन लाख ४० हजारांची एल-०१ जाफरानी जर्दा असा बारा लाखांचा गुटखा व १५ लाखांचे वाहन असा एकूण २७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमत बाविस्कर यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनावरील चालक, क्लीनर व वाहनमालक अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका!

KKR vs DC, IPL 2024: आज कोलकाता -दिल्ली आमने सामने ! कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह जाहीर! काय आहे चिन्हाची खासियत?

Malvani liquor Poisoning Case: मालवणी दारुकांड प्रकरणात ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता; ६ मे रोजी शिक्षेवर सुनावणी

Pm Modi In Satara: मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT