Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका!

उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून त्यांनी बाहेर आलं पाहिजे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. भारतामध्ये राम - राम करायचे नाही तर पाकिस्तानात जाऊन करायचे का...?

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून त्यांनी बाहेर आलं पाहिजे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. भारतामध्ये राम - राम करायचे नाही तर पाकिस्तानात जाऊन करायचे का...? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी केलाय. त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणे सुरु केलं असेल तरी आम्ही राम रामच करणार. त्याचबरोबर "मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय, उद्धव ठाकरे यांनी केलेलं एक विकासाचं काम दाखवावं. जीवनामध्ये कधी एक विकासाचं काम करु शकले नाहीत, अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं काम करू शकले नाहीत. त्यांनी मोदीजींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्यासारखे आहे" अशी टीकाही फडणवीसांनी केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com