Jalgaon: चिन्‍ह, मैदानासाठी भांडले; आता शिवसेना भवनासाठी मारमाऱ्या होतील; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

चिन्‍ह, मैदानासाठी भांडले; आता शिवसेना भवनासाठी मारमाऱ्या होतील; मंत्री गिरीश महाजन यांची टीका
Jalgaon Girish Mahajan
Jalgaon Girish MahajanSaam tv

जळगाव : आमदार, खासदार फुटल्‍यानंतर मोठा उठाव झाला. शिवसेना कोणाची यावर प्रश्‍नचिन्‍ह उभे राहून नावासाठी, चिन्हासाठी भांडले, मैदानासाठी भांडत होते. आता काही दिवसांनी शिवसेना (Shiv Sena) भवनसाठी मारामाऱ्या होतील; अशी खोचक टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. (Jalgaon Girish Manajan News)

Jalgaon Girish Mahajan
Accident: दुभाजकाला धडकून कार २० फूट उंच उडाली; पुणे- सातारा महामार्गावरील भीषण अपघात

जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) बोलत होते. महाजन म्‍हणाले, की शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत खरी शिवसेना आमची असल्याचा दावा केला. पक्षातील गटनेते पदासोबतच पक्ष, पक्षाच्‍या चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

त्‍यांचे फळ भोगावे लागले

आमच्‍या सोबत राहून निवडून आले. परंतु आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचे फळ शिवसेनेला भोगावे लागत आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार व 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेल्‍याचे देखील महाजन यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com