Accident: दुभाजकाला धडकून कार २० फूट उंच उडाली; पुणे- सातारा महामार्गावरील भीषण अपघात

दुभाजकाला धडकून कार वीस फुट उंच उडाली; पुणे- सातारा महामार्गावरील भीषण अपघात
Accident News
Accident NewsSaam tv

पुणे : पुणे- सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाजवळ आज भीषण अपघात (Accident) झाला. पावसामुळे (Rain) रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकाला धडकून २० फूट उंच उडाली. दुभाजक ओलांडून समोरच्या लेनमध्ये कार गेल्याने अपघात झाला. (Pune Satara Highway Accident)

Accident News
Raosaheb Danve: पीजे रेल्वे विस्तारासाठी संपूर्ण निधी केंद्र देणार; रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची घोषणा

पुणे- सातारा (Satara) महामार्गावर शिंदेवाडी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जातं असताना हा अपघात झाला. पाऊस सुरू असल्‍याने कार चालकाला रस्‍त्‍याचा अंदाज आला नाही. यामुळे कार दुभाजकावर (Accident News) धडकली. कारची धडक इतकी जोरात होती, की कार २० फूट उंच उडाल्‍याचे प्रत्‍यक्षदर्शीनी सांगितले. कार उंच उडाल्‍यानंतर दुभाजकाच्‍या दुसऱ्या बाजूला जावून पडली.

एअरबॅगमुळे अनर्थ टळला

महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्‍या कारचा अपघात झाला. कार दुसऱ्या बाजूने पडल्‍यानंतर सुदैवाने समोरून येणारे दुसरे वाहन नसल्याने आणि कारमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारमधील चौघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रवाना केले आहे. अपघातानंतर मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com