मुंबईतील मालवणी दारुकांड प्रकरणी (Malvani Alcohol Poisoning Case) कोर्टाने ४ जणांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणातील इतर १० आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणाच्या ९ वर्षांनंतर मुंबई सेशन कोर्टाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलेल्या ४ आरोपींच्या शिक्षेवर येत्या ६ मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. २०१५ मध्ये झालेल्या या दारुकांडात विषारी दारू पिऊन १०६ जणांचा मृत्यू झाला होता.
मालवणी येथे झालेल्या या दारुकांडामुळे मोठा गोंधळ उडाला होता. विषारी दारु प्यायल्यामुळे एकापाठोपाठ एक असे तब्बल १०६ जणांचा मृत्यू झाला होता. दारुच्या नावाखाली आरोपी या नागरिकांना केमकल प्यायला देत होते. गावठी दारु पिणाऱ्यांना पाण्यात मिथेनॉल मिसळून दिले जात होते. त्यामुळेच या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने फरार आरोपी मंसूर लतीफ खान उर्फ अतीकला दिल्लीतून अटक केली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
ही विषारी दारु प्यायल्यानंतर १०६ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्यावेळी ४० पेक्षा अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. विषारी दारु प्यायल्यामळे अनेकांना आपली दृष्टी देखील गमवावी लागली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे विधान तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
आरोपी पाण्यामध्ये मिथेनॉल मिसळून ते दारु म्हणून विकत होते. ते नागरिकांना अशाच पद्धतीची दारु प्यायला देत होते. पण १७ जून २०१५ मध्ये मिथेनॉल आणि पाण्याच्या प्रमाणात गडबड झाली. दारुच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या या केमिकलने एक-एक करत १०६ नागरिकांचा बळी घेतला होता. या मालवणी दारुकांडामुळे राजकारण खूपच तापले होते. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी विरोधकांनी मागणी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.