Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: ग. स. बँकेतच कर्मचाऱ्याचे धक्‍कादायक कृत्‍य; बँकेने बजावल्‍या होत्‍या नोटीसा

ग. स. बँकेतच कर्मचाऱ्याचे धक्‍कादायक कृत्‍य; बँकेने बजावल्‍या होत्‍या नोटीसा

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरातील सरकारी नोकरांची सहकारी बँकेतील शिपायाने बँकेच्या जिन्यातच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजले नाही. मात्र, त्यांच्यावर बँकेचे (Bank) दहा लाखांचे कर्ज असल्याने बँकेने नोटीसा बजावल्या होत्या. त्यास वैतागून (Dhule News) शिपायाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. (Letest Marathi News)

देवपूर (धुळे) येथील एकतानगरातील योगेश सुकलाल निकम (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. ग. स. बँकेचे कार्यालय बुधवारी सुटीमुळे बंद होते. शिपाई योगेश निकम यांची ड्युटी होती. दरम्यान त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांवरील मजल्याच्या ग्रीलला नळीच्या सहाय्याने गळफास घेतला.

शाखाधिकारी बँकेत आल्‍यानंतर समोर आली बाब

बँकेचे शाखाधिकारी प्रशांत बोरसे सायंकाळी साडेचारला कामासाठी बँकेत आले असता त्यांना ही बाब लक्षात आली. याबाबत त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक संजय देसले यांच्यासह शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. नंतर बँकेचे व्यवस्थापक भारत भामरे, लेखा व्यवस्थापक राजेंद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. तसेच शहर पोलिस ठाण्याचे कैलास दामोदर व कर्मचारीही दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT