शिवसेनेचा भगवा 
महाराष्ट्र

मोदींच्‍या राज्‍यात शिवसेनेचा भगवा अन्‌ धुळ्यात फुटले फटाके

मोदींच्‍या राज्‍यात शिवसेनेचा भगवा अन्‌ धुळ्यात फुटले फटाके

भूषण अहिरे

धुळे : गुजरात येथील दादरानगर हवेली लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळविला. गुजरातमध्‍ये मिळालेल्या विजयाचे फटाके धुळ्यात फुटले अन्‌ शिवसैनिकांनी जल्‍लोष केला.

महाराष्ट्र राज्याबाहेर शिवसेनेचा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार विजय झाला असून गुजरात राज्यातील दादरानगर हवेली येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला आहे. गुजरात राज्यामध्ये शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचे फटाके धुळ्यात फूटताना दिसून आले. शिवसेनेच्या या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष धुळ्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडून साजरा केला आहे.

महाराष्‍ट्राबाहेरील शिवसेनेच्‍या पहिल्‍या खासदार

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकवणारे शिवसेनेच्या पहिल्या खासदार कलाबेन डेलकर यांचे अभिनंदन करतांना धुळ्यातील शिवसैनिकांतर्फे जय भवानी जय शिवाजी जयघोष करत व फटाके फोडत ऐतिहासिक विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्याच बरोबर देगलूर विधानसभा पोट निवडणुकीत महाआघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या विजयाबद्दल शिवसेना महानगर धुळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले असल्याचे बघावयास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महापालिका निवडणुकीत कोणाशी युती होणार- अजित पवारांची महत्वपूर्ण बैठक

IAS Officers Transfers: धडाधड IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ आयुक्त आणि १० डीएमसह ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shreyas Iyer Surgery : श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया, नेमकं काय झालं होतं? कधी मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज?

१०x१० च्या खोलीत खरोखरच ३८ मतदार? आदित्य ठाकरे यांच्या दाव्याचा साम टीव्हीचा रियालिटी चेक|VIDEO

Ratnagiri Tourism : रत्नागिरीत 'या' ठिकाणी आहे साधा-सोपा ट्रेकिंग पॉईंट, लोकेशन आताच नोट करा

SCROLL FOR NEXT