Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : शिवसेना शिंदे गटाचे महावितरण कार्यालयात झोपून आंदोलन; भारनियमन विरोधात आक्रमक

dhule News : गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये उष्णतेची लाट बघावयास मिळत असून अशा परिस्थितीमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत

भूषण अहिरे

धुळे : महावितरण विभागाच्या लोड शेडिंग धोरणा विरोधात आक्रमक होत शिंदे गट शिवसैनिकांनी थेट चटया, तक्के घेऊन विजेवर चालणाऱ्या उपकरणांना सोबत घेऊन थेट धुळे शहरातील साक्री रोड येथील वीज वितरण कार्यालय गाठले. त्या ठिकाणी चटाया व तक्के टाकून कार्यालयामध्येच झोपून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून धुळे (Dhule) शहरामध्ये उष्णतेची लाट बघावयास मिळत असून अशा परिस्थितीमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र वीज वितरण विभागातर्फे वारंवार विजेचा पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांना वीज वितरण (Mahavitaran) विभागाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. वाढत्या उष्णतेचा त्रास देखील सहन करावा लागला आहे. यामुळेच वीज वितरण विभागाच्या या अनागोंदी कारभाराविरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

सरकारला घरचा आहेर

भर उन्हाळ्यात होत असलेल्या या भारनियमनाचा (Load Shedding) त्रास नागरिकांना होत आहे. या विरोधात (Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. चला झोपायला एमएसईबी ऑफिसला या घोषवाक्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वीज वितरण कार्यालयात झोपून आंदोलन केले. यावेळी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT