Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule: महापालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन

महापालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील समस्‍या, खड्डेमय रस्‍ते तसेच २२ लाखाचा रस्‍ता चोरी या मुद्यांवर शिवसेनेने आज आक्रमक भुमिका घेतली. या विरोधात धुळे महापालिकेसमोर (Dhule Corporation) आंदोलन करत आयुक्‍तांना घेराव घातला. (Dhule Corporation News)

शहरातील कॉलनी परिसरात तसेच मनपा हद्दवाढीतील 11 गावांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव (Ganesh Festival) व अगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांची युध्दपातळीवर डागडूजी करावी. तसेच 22 लाखांचा रस्ता चोरीप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आज जिल्हा शिवसेनेच्यावतीने (Shiv Sena) महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले, यासंदर्भात आयुक्त देविदास टेकाळे यांना घेराव देखील घालण्यात आला असून आयुक्तांना याबाबदचे निवेदन देण्यात आले आहे.

प्रशासना विरोधात घोषणाबाजी

आंदोलनावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्यांसंदर्भात सुरू असलेला अनागोंदी कारोबारा विरोधामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्याने परिसर दुमदुमून निघाला होता, मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: निक्की रिलेशनशीपमध्ये? कोण आहे बॉयफ्रेंड?

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Aadhaar Card Update: आता फुकटात करा आधार कार्ड अपडेट ; फक्त या स्टेप्स करा फॉलो

Priya Bapat : प्रिया बापटचा भन्नाट परफॉर्मन्स; लाईव्ह कॉन्सर्टमधील गाण्याचं होतंय कौतुक

Viral Video: भीषण वास्तव! इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी पैसे नाहीत तरुणाने केली तब्बल ५४ मोबाईलची चोरी; घटनेचा CCTV व्हायरल

SCROLL FOR NEXT