Suicide Saam tv
महाराष्ट्र

मुलासह महिलेची नदीत उडी; माहेरून येत असतांनाचा प्रकार

मुलासह महिलेची नदीत उडी; माहेरून येत असतांनाचा प्रकार

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : गिधाडे (ता.शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकून महिलेने मुलासह आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१६ जून) दुपारी घडली. सायंकाळी महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले. मुलाचा (Dhule News) मृतदेह मात्र उशिरापर्यंत हाती लागला नव्हता. (dhule news shirpur Woman jumps into river with child)

मृत महिलेचे नाव योगिता रवींद्रसिंह गिरासे (वय ३०) आहे. ती वाडी (ता.शिरपूर) येथील रहिवासी आहे. तिचा पती सुरत येथे कामाला होता. त्याने नुकतीच वाडी येथे शेती घेतली असून तो गावीच स्थायिक होण्याच्या प्रयत्नात आहे. दीड महिन्यांपासून योगिता डोंगरगाव (ता.शहादा) येथे माहेरी होती. तिच्या माहेरच्या लोकांनी बसमध्ये बसवून देत शिरपूरकडे रवाना केले. तिचा पती सुरतला कामानिमित्त गेला असून त्याने वडिलांना वाघाडी (ता.शिरपूर) येथे पत्नीला बसमधून उतरवून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते वाघाडीला वाट बघत थांबले. मात्र ती वाघाडीला पोहचलीच नाही.

उडी घेतल्याचे काहींनी पाहिले

दरम्यान दुपारी शिरपूर-शिंदखेडा रस्त्यावर गिधाडे (ता.शिरपूर) येथील पुलावरून मुलाला ढकलून दिल्यानंतर महिलेनेही नदीत उडी टाकल्याचे दृश्य काहींनी पाहिले. काही मिनिटातच तेथे जमाव जमला. पुलावर एक बॅग पडली होती. तिच्यात एका वहीमध्ये तेजस रवींद्रसिंह गिरासे असे नाव लिहिले असून मोबाईल नंबरही दिला होता. त्यावरुन संपर्क साधल्यावर तिची ओळख पटली. योगिताने मोठा मुलगा तेजस (वय १० वर्ष) याला ढकलून स्वतः:ही आत्महत्या (Suicide) केल्याचे निष्पन्न झाले. परिसरातील मच्छीमारांनी मृतदेह शोधण्यास सुरवात केली. सायंकाळी योगिताचा मृतदेह शोधण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Refund: आयटीआर रिफंड अडकला आहे? ही असू शकतात कारणे; आताच करा हे काम

Ganesh Chaturthi 2025 : घरी पहिल्यांदाच गणपती आणताय? या चुका चुकूनही करू नका

Corporation Election : कार्यकर्त्यांनो लागा तयारीला! मुंबई-पुण्यासह राज्यातील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

सलमान खानच्या Bigg Boss 19मध्ये अंडरटेकर जलवा दाखवणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update: मुंबईचा जोगेश्वरी परिसरात इमारतीच्या तळमजल्याला आग

SCROLL FOR NEXT