शाळा सुरू होऊन दोन दिवसानंतरही आश्रम शाळांमध्ये शुकशुकाट

शाळा सुरू होऊन दोन दिवसानंतरही आश्रमशाळांमध्ये शुकशुकाट
School
SchoolSaam tv
Published On

नंदुरबार : शाळा सुरु होवुन दोन दिवस उलटले तरी आदिवासी पाड्यांवरील शासकीय आश्रम शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आहे. विद्यार्थीच नसल्याने (Nandurbar) चक्क वर्ग खोल्यांना ताळे ठोकुन असल्याने आश्रमशाळांमध्ये शुकशुकाट आहे. (nandurbar news two days after the commencement of school there is a lull in the ashram schools)

School
विधान परिषदेत बविआची मतं भाजपलाच जाणार; सूत्रांची साम टिव्हीला माहिती

राज्यात एकीकडे विद्यार्थी (Student) प्रवशोत्सव मोठ्या थाटामाटत पार पडला. तर दुसरीकडे हे विरोधात्मक चित्र देखील पहावयास मिळत आहे. शाळांमध्ये शिक्षक कर्मचारी हजर आहे. मात्र विद्यार्थीच नसल्याने विद्यार्थ्यांना गाठुन त्यांना शाळेत (School) आणण्यासाठी शाळा प्रशासन, मास्तर आणि कर्मचारी आता वाड्या पाड्यांवर रवाणा झाले आहेत.

आदिवासी विकास मंत्रींच्‍या मतदार संघातील चित्र

शासकिय आदिवासी आश्रम शाळांमध्‍ये आदिवासी मुले शिक्षणासाठी दाखल असतात. परंतु, १५ जूनपासून राज्‍यात शाळा सुरू झाल्‍या असताना देखील अद्याप विद्यार्थी नाहीत. हि परिस्थीती दुसरी तिसरीकडे कुठे नसुन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अ‌ॅड. के. सी. पाडवी यांच्यामतदार संघातील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com