Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: पिस्तोलसह जिवंत काडतुसे बाळगणारी टोळी ताब्‍यात

पिस्तोलसह जिवंत काडतुसे बाळगणारी टोळी ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : भोईटी कडून शिरपूरकडे येणाऱ्या वाहनात पिस्तोलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. शिरपूर तालुका (Police) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Live Marathi News)

शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहिती दारांमार्फत माहिती मिळाली. भोईटी कडून (Shirpur) शिरपूरकडे येणाऱ्या चार चाकी वाहनात काही इसम आपल्यासोबत गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत कर्तुसे आपल्यासोबत बाळगून आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी एक पथक तैनात करून रवाना केले. संशयित वाहन संबंधित पथकातील पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी पाठलाग करून पकडले

पोलिसांनी वाहन चालकास वाहन थांबवण्यासाठी इशारा केला असता पोलिसांकडे दुर्लक्ष करत वाहन चालकाने भरधाव वेगाने शिरपूरच्या दिशेने पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले असता तपासणी वाहनांमध्ये तीन गावठी बनावटीचे पिस्तोल व सहा जिवंत कर्तुसे आढळून आले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास सात लाख 66 हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT