Shirpur News Dog Bite Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; तरूणाचा मृत्‍यू, बालकाची प्रकृती गंभीर

पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; तरूणाचा मृत्‍यू, बालकाची प्रकृती गंभीर

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या युवकाचा मंगळवारी मृत्यू झाला. ग्यारसीलाल ताराचंद पावरा (वय 24) असे मृताचे नाव असून तो हिंगोणीपाडा (ता.शिरपूर) येथील रहिवासी आहे. त्याच गावात श्वानदंश झालेल्या सुशील सखाराम पावरा (वय 10) या बालकाची प्रकृतीही गंभीर असून त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले. (Maharashtra News)

ग्यारसीलाल व सुशील या दोघांनाही सुमारे महिनाभरापूर्वी गावातील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर दोघांना धुळे येथे नेऊन शासकीय रुग्णालयातून (Dhule News) अँटी रेबीज लस देण्यात आली. उपचार घेऊन ते गावी परतले. मात्र त्यांच्या नातलगांच्या म्हणण्यानुसार उपचार घेतल्यानंतरही ग्यारसीलाल पूर्ववत होऊ शकला नव्हता. तो घरात पडून होता. तीन दिवसांपासून त्याला झटके येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवत होती.

रस्‍त्‍यातच झाला मृत्‍यू

मंगळवारी त्याची अवस्था गंभीर झाल्याने नातलग (Shirpur) शिरपूरला घेऊन येत होते. मात्र रस्‍त्‍यातच त्याचा मृत्‍यू झाला. नातलगांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यानंतर मृतदेह घेऊन ते गावी निघून गेले. ग्यारसीलालच्या मृतदेहाची परस्पर नेऊन विल्हेवाट लावल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण समजण्यास अनेक अडचणी आहेत.

बालकावर उपचार सुरू

सुशील पावरा या बालकालाही काही दिवसांपासून त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मंगळवारी धुळे येथे रवाना करण्यात आले. ग्यारसीलाल व सुशील यांना चावा घेणार्‍या श्वानाने त्याच रात्री गावातील एका म्हशीलाही चावा घेतला होता. तिचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. श्वानदंशाने मृत्यू होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT