Shindkheda News Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda News : शिंदखेडा पोलीसांविरोधात डफ बजावो आंदोलन; हल्लेखोरांवर कारवाई न झाल्याने भिल्ल समाज विकास मंच आक्रमक

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे पेट्रोल पंपावरील युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. सदर घटनेला एक महिना उलटून पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई नाही

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आदिवासी युवकावर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. परंतु, हल्लेखोर अद्याप फरार असून पोलीस देखील या प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप करत पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात डफ बजाओ आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा तहसील कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे पेट्रोल पंपावरील युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. सदर घटनेला एक महिना उलटून देखील अद्याप शिंदखेडा पोलीस अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना पकडले नसून, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे युवकाच्या नातलगांसह आदिवासी बांधव आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

सदर घटनेला एक महिना उलटून देखील तीन दिवसात संबंधित हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले होते. मात्र आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक महिन्यानंतर देखील अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह असल्याचे म्हणत अकार्यक्षम पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, या मागणीसाठी भिल्ल समाज विकास मंचच्या वतीने शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या बाहेर डफ वाजवून निषेध आंदोलन करण्यात आले. 

तर पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात आंदोलन 

तसेच भिल्ल समाज विकास मंचच्या वतीने पुढील आठ दिवसाच्या आत हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास नाशिक येथे पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातच डफ वाजवून या अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला महाराष्ट्रात मोठा हादरा; उपनेता, माजी उपमहापौरांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

Local Body Elections : मतदानाआधीच उधळला विजयी गुलाल! मलकापूरमध्ये भाजपचे एकाच वेळी ५ उमेदवार बिनविरोध

Prajakta Mali Photos: अस्सल मराठमोळं सौंदर्य, प्राजक्ताच्या लेटेस्ट फोटोशूटने केलं सर्वांनाच घायाळ

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT