Dhule BJP Shivsena Controversy Saam tv
महाराष्ट्र

Dhule BJP Shivsena Controversy: भाजप मंत्र्याचे रोज पुतळे जाळू, शिंदे गटाचा भाजपला इशारा; वादाच्या ठिणगीचे काय आहे कारण

Dhule News : भाजप मंत्र्याचे रोज पुतळे जाळू, शिंदे गटाचा भाजपला इशारा; वादाच्या ठिणगीचे काय आहे कारण

भूषण अहिरे

धुळे : राज्य सरकारमध्ये भाजप व शिंदे गट शिवसेना एकत्र आहेत. मात्र धुळ्यात शिंदे गट शिवसेना व भाजपमध्ये (BJP) वादाची ठिणगी पडल्याचे पहावयास मिळाली आहे. शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना (Dhule) आरेला कारे करू असे म्हणत भाजपच्या मंत्र्यांचे रोज पुतळे जाळण्याचा गंभीर इशाराच दिला आहे. (Breaking Marathi News)

एकीकडे राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर भाजप व शिंदे गट एकत्र येऊन आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना (Shiv Sena) रोखण्याच्या तयारीत जुंपलेले आहेत. तर दुसरीकडे धुळ्यात मात्र या युतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात धुळ्यात भाजप व शिंदे गटात पडलेला मिठाचा खडा दूर करण्यात वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप केले जातील का हे बघणं अवचित्याचे ठरणार आहे.

सामंतांचा पुतळा जाळल्यावरून पडली ठिणगी 

धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथे केमिकल फॅक्टरीला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परवानगी दिली. यावरून नरडाणा येथील शेतकरी आक्रमक होऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या निषेध आंदोलनामध्ये भाजपचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळाले होते. यावरून शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील आक्रमक झाले असून निषेध करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हतळे आहे. अशा पद्धतीने मंत्र्यांचे पुतळे दहन करून निषेध आंदोलन केले जाणार असेल, तर यापुढे भाजपच्या नेत्यांचे देखील पुतळे दहन करू; अश्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT