Dhule News Saam tv
महाराष्ट्र

शिंदे गट म्‍हणजे चायना आयटम; शिवसेना नेते बबन थोरातांचा निशाणा

शिंदे गट म्‍हणजे चायना आयटम; शिवसेना नेते बबन थोरातांचा निशाणा

भूषण अहिरे

धुळे : शिंदे गट म्‍हणजे चायना आयटम आहे. किती वेळ टिकेल सांगता येत नाही. असे म्‍हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला. दसरा मेळावा शिवसेनेचाच होईल इतर चायना आयटमने यामध्ये ढवळाढवळ करू नये; असं म्हणत शिंदे गट हा चायना आयटम असल्याचे म्हणत थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत जास्त दिवस चायना आयटम टिकत नाही. असा आरोप (Shiv Sena) शिवसेना नेते बबन थोरात यांनी केला आहे. (Dhule Political News)

शिवसेना नेते बबनराव थोरात हे (Dhule) धुळे दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेनामध्ये झालेल्या युती नंतर धुळ्यात देखील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी बैठक बोलावली होती. यादरम्यान थोरात यांनी पुण्यात मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात आपल्याला अडकवून या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाकडून अमिश दाखवण्यात आल्याचा खळबळ जनक व घनाघाती आरोप देखील केला आहे.

देव माणसाच्या पाठीत खंबीर खुपसला

गद्दारांची वाहन फोडण्यासंदर्भात केलेल्या भाषणावरून शिवसेना नेते बाळासाहेब थोरात अडचणीत सापडले होते. त्यानंतर काल धुळ्यातील साक्री येथे एका कार्यक्रमादरम्यान मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावरून थोरात यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या देव माणसाच्या पाठीत खंबीर खूपसणाऱ्यांना मिळेल त्या ठिकाणी जनता अशाच प्रकारे उत्तर देईल असे वक्तव्य केले आहे.

भाजपचा डाव परंतु मुंबईवर शिवसेनेचाच भगवा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलत असताना थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला. हा सर्व भाजपचा डाव असून मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन त्याचबरोबर राज ठाकरे यांना देखीलसोबत घेऊन भाजपने कितीही प्रयत्न केले. तरी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित असलेला मराठी माणूस उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि शिवसेनेचाच भगवा फडकेल असे मत व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT