Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बनावट दारूचा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Dhule News : गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामचा मळा परिसरातील स्टार गॅरेज येथे उभ्या असलेल्या वाहनाची तपासणी केली

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या जामचा मळा येथून छोटा हत्ती या वाहनामधून (Dhule) बनावट दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. ही कारवाई धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने केली. (Breaking Marathi News)

गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Dhule LCB) जामचा मळा परिसरातील स्टार गॅरेज येथे उभ्या असलेल्या वाहनाची तपासणी केली. या ठिकाणी चोरट्या पद्धतीने वाहनाच्या मागील बाजूस कप्पा करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारूच्या भरलेल्या बॉटल्स पोलिसांना (Police) आढळून आल्या आहेत. वाहन चालकासह हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन्य संशयितांचा शोध सुरु 

या कारवाईत जवळपास तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, त्याचबरोबर वाहन चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहिती दरम्यान काही संशयितांची नावे देखील समोर आले असून, या सर्व संशयितांचा पुढील शोध चाळीसगाव रोड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT