Agriculture News : गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड घेणे टाळावे; कृषी विभागाचे आवाहन

Washim News : कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Agriculture News Cotton Crop
Agriculture News Cotton CropSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील कापुस पिकाच्या वेचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. कापुस (Cotton) पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने काही (Washim) उपाययोजना करणे आवश्यक आहे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम अखंडित चालू राहते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी (Farmer) डिसेंबरअखेर कपाशी पीक काढून टाकावे; असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (Tajya Batmya)

Agriculture News Cotton Crop
Agricultural Store Theft: पत्रा कापून कृषी दुकानात चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जिनिंग, प्रेसिंग मिल, गोडाऊन आणि मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घकाळ साठवणूक केली जात असल्याने अशा साठवलेल्या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या (Cotton Crop) कापसाच्या पिकासाठी स्त्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Agriculture News Cotton Crop
Buldhana News : विज वाहिनी निरीक्षणासाठी आलेल्या पथकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कापूस फरदड निर्मुलन मोहीम घेऊन डिसेंबर महिन्यात प्रत्येक कापूस उत्पादक गावात फरदडमुक्त गाव करावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम खंडित करण्यासाठी ५ ते ६ महिने कापूस विरहित ठेवावे. कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडवी. कपाशीच्या फरदडामध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्यांची गंजी करून बांधावर ठेवू नये. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष व इतर अवस्था नष्ट होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com