Dog Attack Saam tv
महाराष्ट्र

Dog Attack : शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; विद्यार्थिनी गंभीर जखमी

Dhule news : मोकाट कुत्र्यांनी मागील पंधरा दिवसात चौदा ग्रामस्थांना लचके तोडत जखमी केले आहे. सातत्याने घटना घडत असताना देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

Rajesh Sonwane

धुळे : मोकाट कुत्र्यांचा प्रश्न वारंवार समोर येत असून रस्त्याने जाणाऱ्यावर जीवघेणा हल्ला कुत्र्यांकडून होत आहेत. अशात सकाळी शाळेत जात असलेल्या दुसरीतील विद्यार्थीनीवर कुत्र्याने अचानक हल्ला करत मुलीच्या चेहऱ्यावर चावा घेत लचके तोडले आलेत. सुदैवाने रस्त्याने जाणाऱ्या एकाने कुत्र्याला हटकल्याने चिमुकलीचा जीव वाचला आहे. मात्र यात सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.

धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे हि घटना घडली असून हर्षदा अशोक पाटील असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान हर्षदा हि जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी रस्त्याने जात असताना मोकाट कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला करत चेहऱ्यावर चावा घेत लचके तोडले आहे. यामुळे मुलीने जोरजोरात आरोड्या मारल्या. 

सुदैवाने वाचला चिमुकलीचा जीव 

चुमुकल्या हर्षदा हिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. यावेळी रस्त्याने जात असलेल्या बंडू माळी यांनी प्रसंगावधान राखत कुत्र्याला हटकल्याने हर्षदाची सुटका झाल्याने तिचा जीव वाचला आहे. यात हर्षदा हि गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान चौकातील युवकांनी तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ नेले. प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने धुळ्यातील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे उपचार सुरू आहेत. 

पंधरा दिवसांत चौदा जण जखमी
कापडणेत चिमुकलीवर हल्ला करण्यात आल्याची घटना पहिली नसून गावात मागील पंधरा दिवसात १४ जण कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार लहान बालकांचा समावेश असून एक अडीच वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT