Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : पांझरा नदीत वाहून जाणाऱ्या वृद्धास वाचविले; आपत्ती व्यवस्थापनच्या जवानाचे तात्काळ बचाव कार्य

Dhule News : धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातुन पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला आहे. यामुले पांझरा नदीला पूर आला आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण भरले आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवार करण्यात आली आहे. यामूलोए पांझरा नदीला पूर आल्याने या पुरात एक वयोवृद्ध व्यक्ती वाहून जात होता. मात्र आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानाने या वृद्धाचे प्राण वाचविले आहेत. 

धुळे (Dhule) जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातुन पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला आहे. यामुले पांझरा नदीला पूर आला आहे. दरम्यान धुळे शहरात वाहत असलेल्या पांझरा नदीच्या काठावर पाय धुण्यासाठी गेलेल्या वयोवृद्धाचा पाय घसरल्यानंतर नदीत पडला. नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा वयोवृद्ध इसम पाण्यात वाहून जात होता. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तैनात असलेल्या जवानांच्या सदर प्रकार लक्षात आले. 

नदीला पूर असल्याने प्रशासनाने नदी किनारी आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात केली आहे. दरम्यान वृद्ध वाहून जात असल्याचा प्रकार तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांचे लक्ष गेल्याने त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. यानंतर वाहून जात असलेल्या वयोवृद्धाला वाचविले आहे. (Panjhara River) पांझरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला असल्यामुळे प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार सतर्कतेचा इशारा दिला जात असताना देखील नागरिक नदीपात्रात जात असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT