Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: मध्यरात्रीनंतर पाच घरांना आग; संसारपयोगी साहित्‍य जळून खाक

मध्यरात्रीनंतर पाच घरांना आग; संसारपयोगी साहित्‍य जळून खाक

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरात मध्यरात्रीनंतर अचानक चार ते पाच घरांना आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संसार उपयोगी सर्व महत्त्वाचे (Dhule News) सामान जळून खाक झाले असून या घटनेमध्ये सुदैवाने जीवित हानी टळली आहे. (Breaking Marathi News)

साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी कुंभार वस्ती या ठिकाणी पणत्या बनवणाऱ्या कुंभाराच्या घराला रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक (Fire) आग लागली. धुराचे लोड बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने परिसरातील नागरिकांनी घरात असलेल्या सर्व कुटुंबियांना तात्काळ बाहेर काढले.

आगीच्‍या रौद्ररूपात पाच घरे जळाली

आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले व यामध्ये जवळपास चार ते पाच घर जळून खाक झाले आहेत. या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ऐन दिवाळीच्या दिवशीच नुकसानग्रस्त कुटुंबीयांना बेघर होण्याची वेळ ओढावली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत देऊन दिलासा द्यावा; अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबीयांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

Amravati : पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास नकार, नातेवाईक संतप्त

SCROLL FOR NEXT