Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : आरक्षित जमिनीवर अतिक्रमण; मेंढपाळ बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

Dhule News : मेंढपाळांसाठी दहा ते वीस हेक्टर क्षेत्र वनचराईसाठी आरक्षित असताना त्या ठिकाणी अतिक्रमण धारकांतर्फे वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

भूषण अहिरे

धुळे : मेंढपाळ बांधवाना मेंढपालनासाठी काही जमिनी आरक्षित केल्या आहेत. परंतु या जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. यामुळे अतिक्रमण धारकांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आज शेकडो मेंढपाळ बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या देत आंदोलन करण्यात आले. 

मेंढपाळांसाठी दहा ते वीस हेक्टर क्षेत्र वनचराईसाठी आरक्षित असताना त्या ठिकाणी अतिक्रमण धारकांतर्फे वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. इतकेच नाही तर मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी मज्जाव करण्यात येत असतो. (Dhule) वन अधिकारी देखील या संदर्भात मेंढपाळांना सहाय्य करत नसल्यामुळे याबाबत या मेंढपाळांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. परंतु प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन देण्यात येऊन देखील त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

तर आठ दिवसांनी पुन्हा मोर्चा 

प्रशासन लक्ष देत नसल्याने या सर्व मेंढपाळांनी शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून पुढील आठ दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांमध्ये मेंढपाळांचा हा प्रश्न मार्गी लावण्यात न आल्यास हजारोंच्या संख्येने मेंढपाळ बांधव मेंढ्या घेऊन व बिऱ्हाड घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील; असा इशाराच संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

Crime News: घरातून उचलून नेत केलं लग्न; नंतर मुलीचा नग्न व्हिडिओ बनवत केला व्हायरल, इन्फ्लूएंसरचं अमानवी कृत्य

दोन दिवस टिकणारी बॅटरी, स्टायलिश लूक आणि बरंच काही; नव्या स्मार्टफोनची बाजारात धडाकेबाज एन्ट्री होणार

MSRTC Bus Accident: चंद्रपूर-यवतमाळ रोडवर बस-ट्रकचा भीषण अपघात; बसच्या ड्रायव्हर साईटचा चेंदामेंदा,थराकाप उडवणारा|Video Viral

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची मोठी घोषणा; १३ प्रमुख स्टेशनवर महत्वाचा निर्णय लागू, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT