Face Care: चेहऱ्यावर नॅचलर ग्लो हवाय? मग पार्लरला जाण्यापेक्षा ५ मिनिटात घरी तयार करा ही पेस्ट करा ट्राय

Shruti Vilas Kadam

पेस्ट कशी तयार करावी?

एक पिकलेला टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढा. त्यात १–२ चमचे ताजे अ‍ॅलोवेरा जेल मिसळा आणि चांगले हलवा. तयार पेस्ट लगेच वापरणे उत्तम.

Face Care

त्वचेवर कशी लावावी?

चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करा. तयार पेस्ट हलक्या हाताने संपूर्ण चेहरा व मानेला लावा. १५–२० मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २–३ वेळा वापरू शकता.

Face care | Saam Tv

त्वचेला नैसर्गिक ग्लो

टोमॅटोतील अँटीऑक्सिडंट्स आणि अ‍ॅलोवेराचे पोषक घटक त्वचेला नैसर्गिक तेज देतात आणि चेहरा उजळ दिसतो.

Face Care

पिंपल्स आणि डाग कमी

टोमॅटोतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि अ‍ॅलोवेराचे शांत करणारे गुण पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. डाग हलके होण्यासही सहाय्य मिळते.

Face Care | Saam tv

टॅन आणि काळेपणा कमी

सूर्यप्रकाशामुळे झालेला टॅन कमी करण्यासाठी ही पेस्ट उपयुक्त ठरते. त्वचा ताजी आणि स्वच्छ दिसते.

Face Care | Saam Tv

ऑइल कंट्रोल आणि हायड्रेशन

टोमॅटो अतिरिक्त तेल कमी करतो, तर अ‍ॅलोवेरा त्वचेला आवश्यक ओलावा देतो. त्यामुळे ऑइली आणि ड्राय दोन्ही त्वचेसाठी योग्य आहे.

Face Care

त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी

अ‍ॅलोवेराचे थंड गुणधर्म त्वचेची जळजळ, सनबर्न आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.

Face Care

Skirt Top for Girls: कॉलेज आणि ऑफिसाठी ट्राय करा हे ७ लेटेस्ट ट्रेंडी स्कर्ट टॉप; मिळेल फॅशनेबल ग्लॅमरस लूक

Skirt Top for Girls | SaaM Tv
येथे क्लिक करा