Manasvi Choudhary
घरीच सोप्या पद्धतीने वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र वजन कमी करण्यासाठ तुमचा आहार, झोपेची वेळ हे घटक महत्वाचे आहेत.
तुम्ही जिम किंवा कोणत्याही डाएट प्लानशिवाय घरच्या घरी सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता.
आहारात साखर आणि मीठ जास्त खाणे टाळा साखर रक्तातील इन्सुलिन वाढवते, ज्यामुळे चरबी साठते. मीठामुळे शरीरात पाणी साठून राहते
आहारात डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी किंवा सोयाबीनचा समावेश करा. यामुळे भूक कमी लागते आणि स्नायू मजबूत होतात.
झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवा. रात्रीच्या वेळी सॅलड, सूप किंवा मुगाची खिचडी असे हलके पदार्थ घ्या.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी १-२ ग्लास कोमट पाणी प्या. त्यात लिंबू आणि मध टाकल्यास मेटाबॉलिझम वाढतो.
दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान ३० ते ४५ मिनिटे वेगाने चाला.