Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

खड्ड्यांभोवती काढली रांगोळी; चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पालिका प्रशासनाचा निषेध

खड्ड्यांभोवती काढली रांगोळी; चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पालिका प्रशासनाचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : शाळेसमोर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रासलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी (Student) खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. (Dhule Corporation News)

धुळे (Dhule) शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल समोरून जाणारा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी सिव्हील हॉस्पिटलकडून (Hospital) येणाऱ्या दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्याचे योग्य नियोजन (Dhule Corporation) पालिका प्रशासनातर्फे केले जात नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावरतीच तुंबलेले असते. या दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यातून या चिमुकल्या मुलींना ये-जा करावी लागत असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.

दुरूस्‍तीसाठी केली होती मागणी

या नेहमीच साचत असलेल्या गटारीच्या पाण्यामुळे कमलाबाई कन्या हायस्कूल पासून ते जुने कलेक्टर ऑफिसपर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे. या खड्ड्यामुळे रस्त्यांमधून प्रवास करताना देखील या चिमुकल्या विद्यार्थिनींना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या संदर्भातील विनंती यापूर्वी देखील शिवसेनेच्यावतीने धुळे महापालिका आयुक्तांना करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनातर्फे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने या चिमुकल्या विद्यार्थिनींनी खड्ड्याच्या भोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT