Nandurbar: बंदुकीचा धाक दाखवत सराफाची लुट; टोळीतील सहा जणांना अटक

बंदुकीचा धाक दाखवत सराफाची लुट; टोळीतील सहा जणांना अटक
Nandurbar Crime News
Nandurbar Crime NewsSaam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील वळवद ते उमर्दे रस्त्यावर बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या टोळीतील सहा संशयितांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. १६ सप्टेंबरला ही घटना घडली होती. नंदुरबार (Nandurbar) व निजामपूर पोलिसांनी पाठलाग (Robbery) केल्यानंतर दरोडेखोरांनी कार व चोरलेला ९ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल सोडून पलायन केले होते. (Nandurbar Crime News)

Nandurbar Crime News
अभियांत्रिकी विद्यार्थींनीची वसतीगृहातच आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

वळवद उमर्द दरम्यान 16 सप्टेंबरला रात्री 8 वाजेच्या सुमारास म्हशींच्या तबेल्याजवळ रोडवर रुपेश सुमनलाल सोनार (वय 46, रा. शिवाजी रोड, नंदुरबार) हे त्यांचे कोपर्ली येथील (Gold) सोने– चांदी विक्रीचे दुकान बंद करन मित्रासह त्यांची कारने घरी नंदुरबार येथे जात होते. या दरम्‍यान त्यांच्या गाडीच्या पुढे आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने मिरचीची पुड भरकावून 9 लाख 76 हजार 720 रुपये किंमतीचे सोने– चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल बंदुकीचा (Crime) धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले. या विरोधात रुपेश सुमनलाल सोनार यांनी तक्रार दाखल केली होती.

मुद्देमाल टाकून आरोपी होते फरार

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच चोरांचा पाठलाग केला होता. रात्रीचा वेळ असल्याने आरोपींनी वाहन शेतात सोडून दिले व सदर ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपी सोडून गेलेल्या वाहनाची पोलीसांनी पाहणी केली असता वाहनामध्ये आरोपींनी रुपेश सोनार यांच्‍याकडून हिसकावलेले 9 लाख 76 हजार 720 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने, रोख रूपये मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन व बंदूक पोलीसांनी जप्त करून तब्यात घेतली. जबरीने हिसकावून नेलेला माल पोलीसांना हस्तगत करण्यात यश आले होते. परंतु धाडसी जबरी चोरीमधील अज्ञात आरांपींचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आवाहन होते.

बदलापूर येथून पाचजण ताब्‍यात

वेगवेगळी सहा पथके तयार करून तपासाची गती वाढवत गुप्त माहितीच्या आधारे संशयीत आरोपी नामे पाववा आखाडे याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दिपक ठाकरे, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बाँबी बैसाने (सर्व रा. नंदुरबार) अशांनी घटनेच्या दोन दिवसांआधी कट रचला. यानंतर धुळे येथील मनोज पारेराव याच्या सांगण्यावरून सत्तार मेंटल, वसिम बाटला, बापू, पप्पू व अनोळखी एक इसम (सर्व रा. धुळे) असे सर्वांनी मिळून केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नंदुरबार येथील गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दीपक, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बॉबी बैसाणे यांचा शोध घेतला असता ते बदलापूर (जि. ठाणे) येथे पळून गेल्याचे समजले. स्थानिक गुन्हेचे एक पथक तात्तकाळ बदलापूर येथे रवाना करत 21 सप्टेंबरला स्थानिक पोलीसांच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेतले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com