Bharat Jodo Yatra Saam tv
महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra : भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी उद्या धुळ्यात; आमदार पाटलांकडून आढावा

Dhule News :राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १३ मार्चला धुळ्यात पोहोचणार आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी ज्या ठिकाणी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडणार आहे.

भूषण अहिरे

धुळे : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रा आजपासून महाराष्ट्र राज्यात आली आहे. नंदुरबार येथून ही यात्रा उद्या (Dhule) धुळ्यात जाणार असून या यात्रेदरम्यान होणाऱ्या महिला मेळाव्याची तयारी सुरु आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी पाहणी करत आढावा घेतला. (Latest Marathi News)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा १३ मार्चला (Bharat Jodo Yatra) धुळ्यात पोहोचणार आहे. या संदर्भात (congress) काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी ज्या ठिकाणी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडणार आहे. त्या ठिकाणच्या तयारीची पाहणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या पाहणी दरम्यान उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे. यावेळी राहुल गांधी यांचा धुळे शहरातील दौरा कसा असणार आहे; याची माहिती देखील आमदार कुणाल पाटील यांनी दिली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळ्यात होणार रोड शो 

धुळे शहरात राहुल गांधी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचा धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा येथून मनोहर टॉकीजपर्यंत जुना आग्रा रोड मार्गे रोड शो होणार आहे. त्याचबरोबर धुळे शहरातील मनोहर टॉकीजजवळ असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहुल गांधी यांची कॉर्नर सभा देखील होणार आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थित महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या महिला मेळाव्या दरम्यान राहुल गांधी धुळेकरांशी संवाद साधणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT