धुळे : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे संपूर्ण राज्यभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली बघावयास मिळत आहे. (Dhule) धुळ्यात देखील महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संभाजी भिडे (sambhaji Bhide) यांच्या पोस्टरला जोडे मारून व त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे. (Tajya Batmya)
संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर महात्मा गांधी तसेच साईबाबा यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त विधान केले आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार धुळे येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर संभाजी भिडे यांना पाठीशी घालणाऱ्यां विरोधात देखील आक्रमक भूमिका घेण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या पोस्टरला संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.