Dhule Saam tv
महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा निषेध; दोंडाईचात आमदार रावलांचा भव्‍य मोर्चा

ठाकरे सरकारचा निषेध; दोंडाईचात आमदार रावलांचा भव्‍य मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण, शेतकऱ्यांचे वीज जोडणी जुलमी पध्दतीने कापल्याच्या निषेधार्थ, दोंडाईचा शहरातील व्यापाऱ्यांना दंडाच्या सक्तीच्या नोटीसा पाठवून कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ; यासह अनेक मागण्यांसाठी माजी मंत्री तथा शिंदखेडा (Shindkheda) मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचात तहसील कार्यालवर विराट मोर्चा काढून अप्पर तहसीलकार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. (dhule news Protest of Thackeray government MLA jaykumar rawal grand march in Dondaicha)

मोर्चेकऱ्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाजपचे (BJP) पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाल्याचे बघावयास मिळाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून अक्षरशः शेतकऱ्यांना (Farmer) वेठीस धरण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार तर्फे केला जात असल्याचा आरोप लावत आमदार जयकुमार रावल यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT